मी महासमन्वयाचा लहानसा दुवा
भाषण ३ -
प्रदेश, भाषा, संप्रदाय, दार्शनिक भेद यांच्या पलीकडे जाऊन शाश्वताचा शोध घेणाऱ्या महासंतांचा वारसा आपण वाया जाऊ देता कामा नये. त्या वारशाची विटंबना होईल, असं काही आपल्या हातून घडता कामा नये. एका लहानशा खेड्याचं ‘कसबा पुणे’ बनलं, ते आठ घराण्यांमुळे. त्या आठ घराण्यांतील एक घराणं माझं. त्याचमुळे काहीशा ‘सात्त्विक अहंकारा’तून मी असं म्हणू शकतो की, कर्नाटक- महाराष्ट्राच्या महासमन्वयाचा एक लहानसा दुवा मीही आहे. मी .......